बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता RT-PCR चाचणीत सापडेना कोरोना विषाणू; नव्या कोरोना स्ट्रेननं डाॅक्टराची वाढवली चिंता

नवी दिल्ली | आतापर्यंत कोरोनाची लक्षणं दिसल्यावर सर्वजण रॅपिड अँटीजन चाचणी आणि आरटीपीसीआर चाचणी करत होते. पण रॅपिड अँटीजन चाचणीमध्ये त्रुटी दिसून आल्याने सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं. पण आता आरटीपीसीआर चाचणी देखील निष्फळ असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा नवीन स्ट्रेन आणखी धोकादायक असल्याचं दिसून येत आहे, असा खुलासा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे.

कोरोनाची अनेक लक्षणं असून सुद्धा आरटीपीसीआरच्या अनेक चाचणीमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे. ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्याची समस्या आणि फुफ्फुसांचा संसर्ग होता त्यांचं सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसात हलका तपकिरी रंगाचा पॅच दिसला आहे. त्यातून त्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न होत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेननुसार आता आरटीपीसीआर चाचण्यात परिणामता नसेल, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

एक डायग्नोस्टिक तंत्र आहे. यात कोरोना रुग्णांची लॅवेज चाचणी करण्यात येते. ज्यामध्ये रुग्णाच्या नाकातून अथवा फुफुसातून एक द्रव्य घेतला जातो. लोकांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती, त्या सर्वांची लॅवेज चाचणी करण्यात आली. लॅवेज चाचणीत सर्वांना कोरोना विषाणूची बाधा असल्याचं निष्पन्न झालं आहे, असं आकाश हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आशिष चौधरी यांनी म्हणालं आहेत.

दरम्यान, कोरोनाचा नवीन स्ट्रेन आणखी धोकादायक असल्याचं दिसून येत आहे. तर आरटीपीसीआर चाचणी निष्फळ होत असल्यानं देशात कोरोना रूग्णांची ओळख पटण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सर्वाची डोकेदुखी वाढवणार आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट

ऑक्सिजन न मिळाल्याने एका तासात 10 रूग्णांचा मृत्यु; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना

अर्धशतक केलं दीपक हुडाने पण ट्रोल होतोय कृणाल पांड्या

थरारक सामन्यात अखेर पंजाब किंग्ज विजयी; संजू सॅमसनची तुफानी खेळी

पुण्यात कोरोना आटोक्यात?; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More