नवी दिल्ली | कोरोना व्हायरस म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा आहे. अल्लाहनेच चीनमध्ये कोरोना व्हायरस पाठवला आहे, असं वक्तव्य इराकमधील शिया विद्वान हादी अल मोदारीस यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र त्यांनाच आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
एक पुरातन आणि मोठा देश असणाऱ्या चीनमध्ये जगातील 1/7 लोकसंख्या राहते. याच चीनमधील अत्याचारी प्रशासनाने दहा लाखांहून अधिक मुस्लिमांना नजरकैदेत ठेवले होते. याच चीनी लोकांना शिक्षा देण्यासाठी अल्लाहने हा विषाणू पाठवला, असं वक्तव्य मोदारीस यांनी केलं होतं.
अत्याचारी चीनने 40 लाखांहून अधिक मुस्लिमांना नजरकैदेत ठेवलं आहे. ज्या नकाबची ते मस्करी करत होते. तेच नकाब (मास्क) घालून त्यांना फिरावं लागत आहे, असं मोदारीस म्हणाले होते. त्यांचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, जगभरात 5 हजाराहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. भारतात 118 लोकांना कोरोना झाला आहे तर देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 38 कोरोनाग्रस्त रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
बुॉद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद कोरोनामुळं जर्मनीत अडकला
मागची पाच वर्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते- चंद्रकांत पाटील
महत्वाच्या बातम्या-
काश्मीरचे राज्यपाल दारू ढोसत बसतात त्यांना काहीच काम नसतं- राज्यपाल
“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”
शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा- चंद्रकांत पाटील
Comments are closed.