कोरोनाचा Deltacron Varient वाढवतोय सर्वांची चिंता, अत्यंत महत्वाची माहिती समोर
नवी दिल्ली | कोराना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची चांगलीच दहशत होती. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव ओसरताना दिसत असताना कोरोनाचा नवा प्रकार सर्वांची चिंता वाढवत आहे. (Deltacron Varient)
कोरोनाच्या सर्वात धोकादायक डेल्टा आणि वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून डेल्टाक्रॉन व्हेरिएंटची निर्मिती झाली. सर्वात आधी ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचा हा प्रकार आढळून आला. डेल्टाक्रॉनची प्रकरणं कमी आढळून आली असली तरी शास्त्रज्ञांनी मात्र सतर्कतेची भूमिका घेतली आहे.
हा संसर्ग किती गंभीर आहे आणि त्याचा सध्याच्या लसीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो का, हे अद्याप सांगता येत नसल्याचं INSACOGचे नोडल ऑफिसर डॉ. व्ही रवी यांनी सांगितलं आहे. तसेच घाबरून जाण्याचं काही कारण नसल्याचंही डॉ. व्ही रवी यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, भारतात सध्यातरी डेल्टाक्रॉनचा एकही व्हेरिएंट आढळून आलेला नाही. INSACOGने डेल्टाक्रॉनला सध्या ‘व्हेरिएंट अंडर इन्वेस्टिगेशन’ श्रेणीमध्ये ठेवले आहे. डेल्टाक्रॉनची पुरेशी प्रकरणं आढळळी तरच त्याच्याबद्दल निश्चित काही सांगता येऊ शकतं.
थोडक्यात बातम्या-
अन् सकाळी सकाळी संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले…
गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर बोचरी टीका, म्हणाले ‘ काहींना आजही…’
“किरीट सोमय्या कोण मला माहिती नाही, असे चु… देशात भरपूर आहेत”
मोठी बातमी! पुण्यात भाजप राष्ट्रवादीला शिवसेनेचा धक्का
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे मी आज जिवंत आहे”
Comments are closed.