बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना व्हायरस म्हणतोय ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ – उद्धव ठाकरे

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. कोरोना व्हायरस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत होते. यादरम्यान, मुनगंटीवार यांचे भाषण पाहून ‘नटसम्राट’ पाहत असल्याचा भास झाल्याचा टोला मुख्यमंत्र्यानी यावेळी लगावला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केली असल्याचं फडणीसांनी सांगितलं.

इथं कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरु आहे. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का?, नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असे सवालही फडणवीसांनी केले आहेत. तर अधिवेशन टाळण्यासाठी सरकारचं नाटक चालू असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलं आहे. निवडणुकीत काही वेगळं चित्र निर्माण होईल का?, अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाचा विषय अजेंड्यावर आणला जात नसल्याचं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“गुजरातमधील दंगल चुकीची होती हे नरेंद्र मोदींनी मान्य करावं”

केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्या कलाकारांच्या घर आणि कार्यालयांवर इनकम टॅक्सची धाड

सरकारी धोरणांना विरोध करणं म्हणजे देशद्रोह नाही- सर्वोच्च न्यायालय

तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप मंत्र्याचा राजीनामा

धक्कादायक! मंत्र्याच्या सेक्स सीडीतील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More