Top News देश

कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा नवा खुलासा; ‘या’ खुलाशानं एकच खळबळ

नवी दिल्ली |  कोरोनासारख्या महामारीचा दुसरा सर्वोच्च टप्पा येणं आणखी बाकी आहे, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मायकल रियान यांनी हे वक्तव्य केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या इशाऱ्याने जगभरात खळबळ माजली आहे.

ज्या देशांनी कोरोनावर मात केली आहे तसंच लॉकडाऊन उठवला आहे किंवा शिथील केला आहे अशा देशांना जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. एकप्रकारे नियोजन नसताना लॉकडाऊन उठवणं योग्य नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

एप्रिल मे मध्ये कोरोनाचा पहिला पिक आल्यानंतर आणि जसजसा तो शांत होतोय, असं लक्षात आल्यानंतर बऱ्याचश्या देशांनी निर्बंध उठवायला सुरूवात केली. मात्र लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

दरम्यान, जूनच्या शेवटाला कोरोना व्हायरसची दुसरी लाट येईल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्ह केसेस सापडतील, असं भाकित जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

प्रत्येक गरीबाच्या खात्यावर दरमहा हजार रुपये जमा करा!

‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!

महत्वाच्या बातम्या-

माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…

फेसबुकवर संजय राऊतांची पोस्ट, सकाळी सकाळी केलेल्या पोस्टनं वातावरण तापलं

राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या