बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ तीन प्रकारे पसरतोय कोरोनाचा विषाणू, जाणून घ्या काय आहेत लक्षणं

जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. भारतातही कोरोना रूग्णांची संख्या २.८ लाखांच्या वर गेली आहे. या प्राणघातक आजारामुळे आतापर्यंत ८००० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे संसर्ग झालेल्या लोकांना ओळखणे आणि इतरांपासून त्यांना अलिप्त ठेवणे. काही प्रकरणांमध्ये कोरोना संक्रमित लोकांमध्ये स्पष्ट लक्षणे दिसतात, तर काही लोकांमध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतरही कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिटय़ूट, गुरुग्राममधील न्यूरोलॉजी संचालक डॉ. प्रवीण गुप्ता म्हणाले, की कोरोना विषाणूची लागण असीम्प्टोमॅटिक, प्रीसिम्प्टोमॅटिक आणि सीम्प्टोमॅटिक अशा तीन प्रकारे होते. त्यांच्यात असिम्प्टमॅटिक कोरोना व्हायरस असा आहे, की ज्यामध्ये रुग्णाला कोरोना तर होतो मात्र खोकला, ताप आणि श्वासोच्छवासासंबंधी समस्या अशी कोणतीही लक्षणं त्यांना दिसत नाहीत.  प्रीसिम्प्टोमॅटिक अशी प्रकरणे आहेत ज्यात संसर्गानंतर काही दिवसानंतर लक्षणे दिसतात. तसेच सिम्प्टोमॅटिक प्रकरणांमध्ये लक्षणं लगेच दिसतात, जसं की ताप, वाहणारे नाक, खोकला यासारखी लक्षणे संक्रमित व्यक्तीमध्ये दिसतात.

डॉ. प्रवीण गुप्ता म्हणाले, सुरुवातीला असे म्हटले जात होते की लक्षणे न दिसणारे कोरोना रुग्ण कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात करत आहेत. प्रत्यक्षात, हे लोक असिम्प्टोमॅटीक नसून प्रीसिम्प्टोमॅटिक असतात असतात किंवा ज्यांना शरीराच्या दुखण्यासारखी सौम्य लक्षणंच दिसतात.

ते असंही म्हणाले, प्रीस्म्प्टोमॅटिक लोकांमध्ये लक्षणे दिसण्यापूर्वी 48 तास आधी विषाणूचा प्रसार होण्यास सुरवात होते. असे लोक धोकादायक असतात कारण त्यांच्यात लक्षणे नसतात आणि ते कोणतीही खबरदारी घेत नाहीत. प्रीमिम्प्टोमॅटिक लोकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक आहे. यूएस सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने देखील एका अहवालात असे म्हटले आहे, की प्रीसिम्प्टोमॅटिक रोग्यांपैकी 40 टक्के रुग्ण आजारी पडण्यापूर्वीच संसर्ग पसरविण्यास सुरवात करतात.

लक्षणं न दिसणारे लोकांपासून फारसा धोका नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यावर बोलताना दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील इम्यूनोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. चंद वत्तल म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी तसेच असे विधान करण्यापूर्वी सावधगिरी बाळगायला पाहिजे होती. आम्हाला पुरावा हवा आहे. आतापर्यंत आलेले बहुतेक अभ्यास हे बहुतेक ऑनलाइन अभ्यास आहेत.

डॉ. वत्तल म्हणाले, “असिम्प्टोमॅटिक प्रकरणं गंभीरपणे घेण्याची गरज आहे. कारण अशा प्रकरणांमध्ये आपल्याला त्यांना कोणाशी संपर्क येतो याची माहिती नसते. त्यामुळे अशा लोकांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.”

डॉ वत्तल म्हणाले की, परिभाषेचा जास्त विचार न करता आपण असे म्हणू शकतो की भारतात लोकल ट्रान्समिशन आहे. हेच कारण आहे की आम्ही हॉटस्पॉट्स आणि कंटेन्टमेंट झोन तयार केले आहेत. कोरोना संसर्गाचा मुख्य स्त्रोत लक्षणे नसलेले किंवा प्रीसिम्प्टेमॅटिक लोक नसतात.

भारतात नाही होत असिम्प्टेमॅटिक लोकांची टेस्ट-

भारतात होत असलेल्या कोरोनाच्या टेस्टिंगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. ICMR च्या नियमावलीनूसार, फक्त लक्षणं दिसणारे लोकच कोरोनाची टेस्ट करु शकतात. याला कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले लोक अपवाद आहेत. १८ मे ला जारी करण्यात आलेल्या आदेशात असं म्हटलं आहे.

कोरोनाचं संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानूसार ICMRने आपल्या कोरोना टेस्टिंगवर संशोधन करायला हवं. नव्या गोष्टी लक्षात घेता जास्तीत जास्त टेस्टिंग करायला हव्यात. ICMRच्या रिसर्च टास्कचे सदस्य आणि PHFI मध्ये महामारी विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक गिरीधर बाबू यांचं म्हणणं आहे की अनेक गोष्टींवरुन असं दिसून आलं आहे की लक्षणं न दिसणारे लोक कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसवू शकतात. फक्त १० टक्के लक्षणं न दिसणाऱ्या लोकांमध्ये नंतर लक्षणं दिसू शकतात. सामान्य लोकांमध्ये लक्षणं न दिसणाऱ्या लोकांचं प्रमाण तब्बल ४० टक्के आहे. त्यामुळे टेस्टिंगच्या पद्धतीत बदल करायला हवा.

आरोग्य मंत्रालयाच्या शक्यतेनूसार भारतात फक्त २० टक्के केसेसमध्ये लक्षणं दिसत आहेत. २० टक्क्यांपैकी १५ टक्के लोक रुग्णालयात दाखल होतात. त्यातील फक्त ५ टक्के लोकांना कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडते. भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत, त्यापैकी मोठ्या संख्येनं रुग्ण बरे देखील होत आहेत.

एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, “आता आपल्याला असं माणून चालायला हवं की आपण ज्यालाही भेटतो तो लक्षणं न दिसणारा कोरोनाचा रुग्ण आहे. दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे. बाजार, दवाखाना तसेच तुम्ही कुठं फिरायला जात असाल तर हे लक्षात ठेवा की तुमच्या आसपास लक्षणं न दिसणारे कोरोनाचे रुग्ण असू शकतात. भारतात लॉकडाऊन उठवला जातोय, अशा परिस्थितीत तर ही शक्यता आणखी वाढणार आहे.”

ट्रेंडिंग बातम्या-

या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव

गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आज 207 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More