बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नदी पार करण्यासाठी कोरोना योद्धांनी लढवली अनोखी शक्कल, फोटो होतोय व्हायरल

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. या संकट काळातही आरोग्य कर्मचारी मेहनत घेताना दिसत आहे. अशतच कोरोना कर्मचाऱ्यांची जिद्द दाखवणारा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

लडाखमध्ये नदी पार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी चक्क जेसीबीची मदत घेतल्याचं दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये नदी पार करण्यासाठी कर्मचारी पीपीई किट घालून जेसीबीच्या मदतीनं नदी पार करतांना दिसत आहे. इतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्यानं त्यांनी हा मार्ग निवडला होता. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा फोटो लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी ट्विट करत शेअर केला आहे. फोटो ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या कोरोना योद्ध्यांना सलाम, ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी कोरोना योद्ध्यांची टीम नदी पार करत आहे. घरीच सुरक्षित राहा आणि कोरोना योद्ध्यांना सहकार्य करा.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

शाब्बास रे पठ्ठ्या! सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत भारताचा सुनिल छेत्री मेसीपेक्षा सरस

Beta आणि Delta व्हेरिएंटवर ‘ही’ लस अधिक प्रभावी; अभ्यासकांनी केला उलगडा

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता- किशोरी पेडणेकर

‘आमचं घर’ काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More