बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”

औरंगाबाद | गेल्या वर्षीपासुन कोरोना महामारीच्या संकटात देश सापडला असताना पहिल्या लाटेतील कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु, पहिल्या लाटेनंतर देशात दुसऱ्या लाटेने धुमाकुळ घालायला सुरूवात केली. तसेच यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात आला असताना आता मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दररोज 1 लाख कोरोनाबाधित रूग्णांची नोंद होईल, असा अंदाज औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आणखी चिंता व्यक्त केली जात आहे. तिसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात धोकादायक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची तब्बल 5 तास बैठक घेतली व बैठकीअंती 6 जणांची कोअर समिती स्थापन केली आहे. हि समिती सर्व जिल्ह्यात जाऊन तेथील कोरोना परिस्थीती व आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात केरळमधुन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण, कोरोना रूग्णसंख्या गेल्या काही दिवसात आटोक्यात आली असताना आता केरळमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, केरळचा मृत्युदर कमी असल्याचं चित्र दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

श्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल!

…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO

‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…

‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More