बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाचं थैमान थांबेना; गेल्या 24 तासातील मृतांची आकडेवारी चिंताजनक

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये काल दिवसभरात 4 हजार 044 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 655 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल कोरोनामुळे 93 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 27 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1401 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,27,631 इतकी आहे. तर पुण्यात 42 हजार 229 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 930 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,78,472 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 16 हजार 610 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्सवर विजय, धवनची जबरदस्त अर्धशतकी खेळी

धक्कादायक! हळदीच्या आदल्या दिवशीच धारदार हत्याराने युवकाचा खून

बकरी, गाय, झोपडी ही संपत्ती, रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी झाली आमदार

आई-पत्नीमधील सततच्या वादाला वैतागून मुलाने उचललं धक्कादायक पाऊल!

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More