बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत जेवणार नाही’; मंत्र्यानं केला मोठा निश्चय

लखनऊ | गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यत भारतात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. या दोन्ही लाटेत अनेकांचे मृत्यु झाले आहेत. तर लवकरच तिसरी लाट देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशच्या मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करत एक अजब शपथ घेतली आहे.

जो पर्यंत देशात कोरोना महामारी संपणार नाही तोपर्यंत जेवणार नसल्याचं उत्तर प्रदेशचे नगर विकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी म्हटलं आहे. त्यांच्या तपस्येमुळेच आता युपीमध्ये कोरोना नियंत्रणात आलाय. दहशदवादाचा नाश करण्यासाठी मागील 5 वर्ष जेवलो नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या उपवासामुळेच आज भारतातील दहशदवाद संपत असल्याचा दावा देखील महेश गुप्ता यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी राष्ट्रनायक नाही तर, विश्वनायक आहेत. त्यांनी ब्राझील सारख्या देशांना लसीच्या रूपात संजीवनी दिली आहे. त्यामुळे अमेरिका देखील त्यांची फॅन झालीय, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदीचं कौतुक देखील केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं देखील कौतुक केलंय.

दरम्यान, कोरोना काळात योगी आदित्यनाथ यांनी सर्वत्र दौरे केले. त्यावेळी त्यांना स्वतःला कोरोना झाला. पण त्यांना स्वतःच्या जिवाची चिंता न करता लोकांना वाचवण्यासाठी पर्यत्न केले, असं म्हणत त्यांनी आदित्यनाथ यांची स्तुती केली आहे. तर या आधाही त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार- अजित पवार

‘…तर ही वेळ आलीच नसती’; रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारला टोला

राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी, पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठीची वेबसाईट बंद; अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार मुदतवाढ

‘वाद विकोपाला गेला तर आम्हाला दंगल काही नवीन नाही’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More