Top News

“कोरोनाची साथ येत्या दोन वर्षांच्या आत संपुष्टात येईल”

जिनिव्हा | कोरोनाची साथ येत्या दोन वर्षांच्या आत संपुष्टात येईल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेब्रिसिस यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही साथीचा मुकाबला करण्यासाठी आता जगाकडे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. सध्या जग खूप जवळ आलं आहे, तसेच एका ठिकाणाहून लोक खूप कमी वेळेत दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतात. प्रवासाची साधनेही जलद झाली आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलावही तितक्याच जलद गतीने होत आहे, असं घेब्रिसिस यांनी सांगितलं आहे.

जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं, त्याचे काही तोटे, तर काही फायदे झाले आहेत. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान फारसे प्रगत नव्हते. 1918 साली आलेली स्पॅनिश फ्लूची साथ दोन वर्षांतच पूर्णपणे ओसरली होती. कोरोनाची साथही दोन वर्षांच्या आत संपण्याची शक्यता आहे, असं घेब्रिसिस म्हटलंय,

एकट्या कोरोना लसीमुळेच ही साथ संपुष्टात येईल, या भ्रमात कोणीही राहू नये. लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळायला हवे व मास्क घालायला हवा. या नियमांचे काटेकोर पालन केले, तरच ही साथ नियंत्रणात येईल, असंही घेब्रिसिस म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

6 तासांपेक्षा अधिक वेळ सीबीआयद्वारे सुशांतच्या घराची तपासण

‘हो…दाऊद इब्राहिम आमच्याच देशात’; अखेर पाकिस्तानने दिली कबूल

राज्यात कोरोनाचा वाढता आकडा, पाहा आजची सविस्तर आकडेवार

दिल्ली-उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोटाचा कट; पकडलेल्या आयसीसच्या अतिरेक्याचा मोठा खुलासा

प्रवासी, मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीबाबत केंद्राचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या