बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा राग, रेमो डिसूझावर निघाला! कोरियोग्राफर हसून हसून लोटपोट झाला, पाहा व्हिडीओ

मुंबई | बॉलीवूडचा प्रसिद्ध डान्स कोरियोग्राफर आणि निर्माता रेमो डिसूझाला मोठा धक्का बसला आहे. काहीही संबंध नसताना एका तरुणाने कोरोना संकटाचा राग त्याच्यावर काढला आहे. खुद्द रेमो डिसुझानेच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रेमोने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. यामुळे रेमोवर राग काढणारा तरुणही खूप फेमस होऊ लागला आहे. झाले असे, या व्हिडीओमध्ये एक तरुण कोरोनासाठी वापरले जाणारे इंजेक्शन आणि लाचखोरीवर बोलत होता. यावेळी त्याने रागाने रेमो डिसुझाचे नाव घेतले. खरेतर त्याला रेमडेसीवीर इंजेक्शनचे  नाव घ्यायचे होते.

तुम्ही या आधीही सोशल मीडियावर या तरुणाचे स्थानिक प्रसार माध्यमांना बाईट देणारे, मोदींविरोधात बोलणारे व्हिडीओ पाहिले असतील. हा तरुण 500 रुपयांची लाचखोरी आणि रेमेसीवीर इंजेक्शनवर बोलत होता. यावेळी त्याने 500 रुपये तर आपल्या देशाचे अधिकारी लाच म्हणून खातात. सिप्ला कंपनीचे जे इंजेक्शन येतेय, ‘रेमो डिसुझा’ येतेय, त्याची किंमत 5000 रुपये आहे, आणि तुम्ही 500 रुपयांत देत आहात, असे तो म्हणाला.

दरम्यान, ही बाब तिथे उपस्थित कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, सोशल मीडियाने तो तरुण बोलताना चुकला हे लगेचच पकडले. हा व्हिडीओ रेमो डिसुझापर्यंत देखील पोहोचला आणि त्याला हसूही आवरले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

थोडक्यात बातम्या – 

राज्यात 4 दिवस पावसाचा इशारा; अरबी समुुद्रातलं ‘तोक्ते’ चक्रीवादळ ‘या’ किनारपट्टीवर धडकणार

लजास्पद! ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; सोशल मीडियावर संतापाची लाट

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार; लसीकरणावरून असदुद्दीन ओवेसी यांची टीका, म्हणाले…

ऐकावं ते नवलच! फॅार्च्युनर गाडीतून वांग्यांची विक्री, पाहा व्हायरल व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More