महाराष्ट्र मुंबई

कोरोनाचा मोठा फटका; रिंकू राजगुरु अडकली या संकटात!

मुंबई | ‘छूमंतर’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त इंग्लंड दौऱ्यावर असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुला लॉकडाऊनचा फटका बसला आहे.

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रिंकूला लंडनमध्येच थांबून राहावं लागत आहे. रिंकूसोबत ‘छूमंतर’ सिनेमाची टीमही इंग्लंडमध्येच आहे.

समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ सिनेमाचे चित्रिकरण इंग्लंडमध्ये सुरु आहे. यामध्ये रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, ‘नाळ’ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेही तिथे शूटिंग करत आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेक मोठे अभिनेते-अभिनेत्री इंग्लंडमध्ये अडकले आहेत. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या इंग्लंडमध्ये आहे. याशिवाय अभिनेता संतोष जुवेकरही लॉकडाऊनमुळे लंडनमध्येच अडकला आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पाहा सविस्तर आकडेवारी

आमदार निलेश लंके यांनी केलेल्या ‘त्या’ आवाहनाला मोठं यश!

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा!

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात!

‘शरद पवारांना आज मी पुन्हा सांगू इच्छितो…’; संभाजीराजे संतापले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या