पुण्यात मनसेने केक कापून साजरा केला कोरोनाचा वाढदिवस!
पुणे | गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं संकट महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पसरलं आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला असताना अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध तर काही जिल्ह्यात अंशतः लाॅकडाउन आणि संचारबंदीसारखे निर्णय घेण्यात आले आहेत.
मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र राज्य सरकार विरोधात ‘गो कोरोना गो’ च्या घोषणा देत केक कापून निषेध व्यक्त केला आहे. राज्यात एक वर्ष झाल्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही म्हणून राज्य सरकारवर मनसेनं टीकास्त्र सोडलं आहे.
मागच्यावर्षी मार्च महिन्यातच दुबईवरून पुण्यात आलेल्या एका दाम्पत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढली होती. दुबईवरून आलेल्या या दांपत्याला डॉक्टरांनी कोणतीही विशेष काळजी न घेता अगदी सामान्य रुग्णासारखं तपासल्याने कोरोनाचा प्रसार आणखी वाढला होता. मंगळवारी एकाच दिवसात पुणे जिल्ह्यात एकूण 1 हजार 412 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मनसेच्या नेते रुपाली ठोंबरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढत लॉकडाउन करण्याऐवजी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली आहे. लाॅकडाउन आणि संचारबंदीचा जनतेला नाहक त्रास होतो. त्यापेक्षा कुचकामी ठरणारी आरोग्य यंत्रणा मजबूत कशी करता येईल याकडे ठाकरे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे, पण…’; मिथुन चक्रवर्ती आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जुंपली
देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाचा घात केलाय- नाना पटोले
‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल
“…तर महाराष्ट्राची जनता काय आदर्श घेणार?, विरोधकांनी विचार करायला हवा”
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारीही देखील अत्यंत धक्कादायक
Comments are closed.