बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात कोरोनाची स्थिती गंभीर, आम्ही मदत करण्यास तयार- चीन

बिजिंग | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे देशात ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड आणि आवश्यक त्या औषधांची कमतरता भासत आहे. या सर्व परिस्थितीवर चीननं प्रतिक्रिया दिली आहे.

भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. यावेळी चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे, असं वांग वेनबिग यांनी म्हटलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावातून भारताला वाचवण्यासाठी आपण तयार असल्याचं चीननं म्हटलं आहे. तसेच भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे याची माहिती मिळाली आहे. तसंच याचा सामना करण्यासाठी आणखी वैद्यकीय वस्तूंचा पुरवठाही कमी होत आहे. आम्ही भारताला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल, असं वांग म्हणालेत.

दरम्यान, दररोज देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. बुधवारी चोवीस तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक 3 लाखांपेक्षा अधिक रुग्णवाढ झाली.

थोडक्यात बातम्या- 

‘सलाम पुणेकर’ म्हणत महापौरांनी पुणेकरांना सांगितली ही खुशखबर

ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनाने निधन!

‘त्या’ वृत्तावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण; महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा

सुमित्रा महाजनांच्या निधनाची फेक न्यूज शेअर केल्याने शशी थरूर यांची फजिती; वाचा नेमकं काय झालं…

महाराष्ट्रातील मृत्यू तांडव थांबेना! विरारच्या रुग्णालयात भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More