बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाची स्थिती भीषण, अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा

मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचदरम्यान, नांदेडमधील स्थिती तर जास्त चिंताजनक झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी नांदेडमध्ये स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. तिथल्या गोर्वधन घाट स्मशानभूमीत दिवसभरात 17 अंत्यविधीची नोंदणी झाली आहे. काल याच स्मशानभूमीत 20 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावरुन नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती बिकट आहे असं लक्षात येते.

नांदेडमध्ये काल 970 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. तर 14 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. नांदेड जिल्ह्यात 8 हजार 715 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यातील 93 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यात 697 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान संपूर्ण संचारबंदीचा निर्णय सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. तर ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगानं वाढतं आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणं सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचना मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

दरम्यान,  आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. या ठिकाणी कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘सचिन सावंतांना उत्तर द्यायला भाजपचे ‘हे’ नेते खंबीर’; फडणवीसांनी उडवली खिल्ली

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण संचारबंदी

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

‘मी त्यासाठी आयुष्यात कधीच खेळलो नाही’; विराट कोहलीने मांडलं रोखठोक मत

“राज्यातील ठाकरे सरकार काॅंग्रेसच्या टेकूवर उभं आहे हे लक्षात ठेवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More