बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू, वृद्ध आई-बापाचा टाहो ऐकून सारं गाव सुन्न

पुणे | शिरूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मलठण येथे दहा दिवसातच कोरोनामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. गायकवाड कुटुंबीयांनीही एकच टाहो फोडला.

मलठण येथील विशाल कृष्णकांत गायकवाड आणि तुषार कृष्णकांत गायकवाड या दोघा भावांचा दहा दिवसातच कोरोनाने बळी घेतला. दरम्यान विशालचा मृत्यू 22 एप्रिल रोजी तर तुषारचा मृत्यू 3 मे रोजी झाला. डोळ्यांदेखत आपल्या पोटच्या पोरांना कायमचं निघून जाताना पाहून आई-वडिलांना आपलं दुःख अनावर झालं. आमचा देव चोरीला गेला हो… असं म्हणून त्यांनी एकच टाहो फोडला, तेव्हा संपूर्ण परिसर सुन्न झाला.

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना शिरूर तालुक्यातील मलठण येथे घडली. कृष्णकांत गायकवाड यांना विशाल, सागर, प्रियंका व तुषार ही मुलं. कृष्णकांत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी मंगल गायकवाड यांनी मोलमजुरी करून पोरांना मोठं केलं आणि मुलांनीही शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात होते. परंतु नोकरी मिळत नसल्याने त्यांनी स्वतःचाच व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि मलठण येथे शौर्य कंप्यूटर इन्स्टिट्यूट नावाचा व्यवसाय उभा केला.

सर्व काही व्यवस्थित सुरू असताना विशालला अचानक कोरोनाची लागण झाली आणि हा आजार त्याने अंगावरच काढला, परिणामी 22 एप्रिलला विशालचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशालच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी तुषार याने केले आणि दोन दिवसातच तुषारला देखील कोरोनाची लागण झाली आणि जास्त त्रास होत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, त्यामुळे अवघ्या दहा दिवसात ऑक्सिजन लेवल कमी होत गेल्याने तुषारचा ही दुर्दैवी अंत झाला.

थोडक्यात बातम्या – 

“…अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”

देव माणूस!! नो लिमिट’ योजनेअंतर्गत टाटांची 2000 कोटींची गुंतवणूक

दिलासादायक! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

“सीरम’ने काहीही करून महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्यावं”

ऑक्सीजनच्या कमतरतेवरून सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला झापलं, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More