‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या फायनलवर कोरोनाचं सावट; गोलंदाजांना फटका बसण्याची शक्यता
मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला. ही मालिका भारताने जिंकली आणि त्याचबरोबर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये जागा मिळवली आहे. पण आता या फायनलवर कोरोनाचं सावट पसरलं आहे. त्यामुळे या फायनलमध्ये गोलंदाजांना फटका बसण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल येत्या 18 ते 22 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथंट्नमध्ये हा फायनल सामना रंगणार आहे. भारत आणि न्युझीलंडने पाॅईट्स टेबलमध्ये पहिला आणि दुसरा क्रमांक पटकवला आहे. त्यामुळे फायनल सामना भारत आणि न्युझीलंडमध्ये खेळवला जाईल. या सामन्यात जो संघ जिंकेल तो ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी करो किंवा मरो असा असणार आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी आयसीसीने काही गोेष्टींवर बंदी घातली होती. आता ही बंदी आयसीसीने जुलै पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे याचा फटका दोन्ही संघाच्या खेळाडूंना बसणार आहे. या सामन्यात खेळाडूंना लाळ वापरण्याची बंदी कायम ठेवली आहे. खेळाडू बाॅल चमकवण्यासाठी लाळीचा वापर करत असतात. यावर मागील वर्षी अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसीने ही बंदी घातली होती. तर फायनलमध्ये होणाऱ्या सामन्यात तिन्हीच्या तिन्ही अंपायर हे स्थानिक म्हणजेच इंग्लंडचे असणार आहेत.
दरम्यान, भारत आणि इंग्लंडच्या टी-20 सामन्यात साॅफ्ट सिग्नलवर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी साॅफ्ट सिग्नलवर फेरविचार करण्याची मागणी केली होती. तर आयपीएलमध्ये साॅफ्ट सिग्नलवर बीसीसीआयने बंदी देखील घातली आहे.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच पोलिसांनी केली मारहाण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन!
खळबळजनक! दिल्लीत भाजप नेत्याने गळफास घेत केली आत्महत्या
“नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”
पार्थ पवारांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.