बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कोरोना फोफावत चालला आहे त्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदी तर काही जिल्ह्ययांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आलेख हा वाढतच चालला असून आजच्या आकडेवारीवरून हे लक्षात येईल.

राज्यात शुक्रवारी हजार 333 नवे करोनाबाधित आढळल्यानंतर आजसुद्धा 8 हजार 623 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. काल राज्यांमध्ये एकूण 48 रूग्णांचा मृत्यु झाला होता तर आज मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे.

राज्यात आज 8623 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. आज नवीन 3648 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 2020951 रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलं आहे. राज्यात एकूण 72530 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता 94.14% झालं आहे.

दरम्यान, सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही लस देशातील वेगवेगळ्या वर्गांना दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील कोरोनाची लस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. खासगी रुग्णालयात गेल्यास पैसे देऊन ही लस घ्यावी लागणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘राज ठाकरेंना कोरोना झाला तर…’; ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची राज यांच्यावर टीका

‘द चॅनेल 1’नं मारली बाजी; मराठी भाषेतलं पहिलं ओटीटी व्यासपीठ सुरु

प्रशासनातील जुन्या जाणत्या अधिकाऱ्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी

‘भारत आणि इंग्लंड आता पुण्यात भिडणार पण…’; बीसीसीआयचा मोठा निर्णय

‘महिलांनो सावध रहा ठाकरे सरकार आहे’; निलेश राणेंचा घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More