मुंबई | दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारही सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून नागरिकांना सजग आणि सर्तकतेचा सल्ला शिवसेनेने दिला आहे.
शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘कोरोना धोक्याची टांगती तलवार मुंबई-महाराष्ट्रावरही आहे, हे विसरुन चालणार नाही. आपल्याला सजग आणि सर्तक रहावेच लागेल’.
तसेच कोरोना लसीची चाहूल देणाऱ्या बातम्या दिलासादायक नक्कीच आहेत, पण त्याच वेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे तडाखे काही ठिकाणी बसू लागले असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ही लाट नसुन त्सुनामी असल्याचे काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या-
दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!
काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला; राहुल गांधीची अहमद पटेल यांना श्रद्धांजली
अहमद पटेल यांनी आयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली, पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन, मुलाने ट्विट करुन दिली माहिती
“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…”