बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीडमधील ह्रदयद्रावक घटना, कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल!

बीड | जगभरात कोरोनानं गेल्या दीड वर्षापासुन थैमान घातलं आहे. या कोरोना महामारीत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळं अनेक कुटूंब उद्ध्वस्त झाले आहेत. अशाच प्रकारे बीडमध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कोरोनामुळे पती गमावल्यानंतर पत्नीने लहान बाळासह आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे शिक्षक दाम्पत्यांचा अंत झाला आहे.

मागील महिनाभरापूर्वी कोरोनामुळं शिक्षक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळं शिक्षिका असलेल्या पत्नीनं आपलं आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्हाच्या केज तालुक्यातील बानेगाव येथे घडली आहे. आपल्या 18 महिन्यांच्या मुलीसह शिक्षिका असलेल्या पत्नीनं विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळं केज परिसरात एकच खळबळ माजली आहे. पतीच्या निधनानंतर पत्नी आपल्या माहेरी आली होती. पती राजाभाऊ जाधवर आणि पत्नी शितल जाधवर असं मयत शिक्षक दाम्पत्याचं नावं आहेत. ते दोघेही पेशाने पुण्यात शिक्षक होते.

दरम्यान, पती राजाभाऊ जाधवर यांच्या निधनामुळं शिक्षिका असलेल्या पत्नी शितल एकाकी पडल्या होत्या. त्यानंतर मुलगी शांभवी सह शितल यांनी आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचललं आहे. यामुळं दु:खद घटनेमुळं जाधवर कुटूंबिंयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

थोडक्यात बातम्या –

…तरच पैसे मिळतील, जे काय करेल ते सरळ करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असतील तर आमची युतीसाठी तयारी’; शिवसेनेकडून स्पष्ट संकेत

‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे…’; उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवांराची प्रतिक्रिया

रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल तर…- छगन भुजबळ

…अन् पुण्यातल्या पठ्ठ्यानं उभारलं चक्क गाडीचं स्मारक, पाहा व्हिडीओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More