बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानची चिंता वाढली! ‘या’ 3 खेळाडूंना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या पुरूष क्रिकेट संघाने भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र अलिकडेच पाकच्या महिला क्रिकेट संघात कोरोना शिरकाव झाल्यामुळे संघ सध्या अडचणीत सापडला आहे. या संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.

आगामी काही काळात पाकिस्तान महिला संघ वेस्टइंडीज विरूद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी पाकिस्तानमधील कराचीच्या हनीफ मोहम्मद हाय परफॉर्मेंस सेंटरमध्ये महिला संघ सराव करत होता. त्यानंतर त्यांची बुधवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानच्या कोणत्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, यासंदर्भात अद्यापही माहिती समोर आली नाही. मात्र 2 नोव्हेंबरपर्यंत पाकिस्तानचा संपूर्ण संघ विलगीकरणात ठेवण्यात आला आहे. त्यानंतर त्या खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना 8 नोव्हेंबर, दुसरा 11 नोव्हेंबर आणि तिसरा 14 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्याआधी पाकिस्तानच्या महिला खेळाडूंना कोरोना चाचणीच्या अहवालाची चिंता सतावत आहे.

थोडक्यात बातम्या-

“ड्रग्ज हे जीवनाश्यक, ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे”

मोठी बातमी! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

‘मी मागासवर्गीय असल्यामुळे…’; समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे धाव

ट्विटरवर हरभजनची गुगली! पाकिस्तानच्या महिला पत्रकाराला म्हणाला, ‘गेट लाॅस्ट…’

“पुढील अनेक दशकांपर्यंत देशाच्या राजकारणात भाजपचं वर्चस्व राहणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More