बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग 15 व्या दिवशी मुंबईत लोकलला प्रचंड गर्दी; ‘मुंबईकरांनो हे वागणं बरं नव्हं!’

मुंबई | मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. मात्र, असं असतानाही मुंबईतील लोकलमधील गर्दी मात्र अजूनही कमी होताना दिसत नाही. आज सलग 15 व्या दिवशी लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या स्थानकात लोकल गर्दीचं हे चित्रं दिसत असून कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचंही पाहायला मिळत आहे.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील केवळ 15 टक्के नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र, सर्व सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी नसतानाही सर्रासपणे लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत होती. तर इतर स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. रेल्वेत सर्वसामान्यांची कुठलीच चेकिंग सध्या होत नाही. सर्व गेट बहूतेक ठिकाणी उघडेच आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कसा थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं 21 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद केली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशानांच लोकलमध्ये प्रवेश दिला जात आहे. पण सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रवासाची काय सुविधा याची मात्र सरकारनं कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे त्यांनी कामावर जायचं कसं? असा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे.

दरम्यान, नालासोपाऱ्यातून घरकाम, मोलमजुरीचं काम करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात आहेत. कामावर नाही गेलं तर घर कसं चालवायचं, मुला बाळांना काय खाऊ घालायचं, लोकलमध्ये प्रवेश नाही. खाजगी वाहनानं जाऊ शकत नाहीत, अशा घरकाम करणाऱ्या महिलांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

थोडक्यात बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; घरासह मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

महामारीच्या काळात ‘या’ पेयांनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती; जाणून घ्या अधिक माहिती

‘राहुल गांधी म्हणजे राजकीय विनोदरत्न’; चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

‘ऑक्‍सिजन’साठी कोल्हापूर-सातारा आमने-सामने; दोन जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद

सुश्मिता सेनने उपलब्ध करुन दिले ऑक्सिजन सिलेंडर्स; चाहत्यांनाही केलं मदतीचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More