बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा नवा विषाणू आहे अत्यंत घातक, जाणून घ्या नवीन विषाणूची लक्षणं

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा दुसरा स्ट्रेन सध्या महाराष्ट्रात झपाट्याने पसरत असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारतर्फे कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.

मागच्या वर्षी पसरत असलेल्या कोरोना विषाणूपेक्षा यावर्षी पसरत असलेला कोरोनाविषाणू हा जास्त धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातील तब्बल 18 राज्यांमध्ये हा कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. तसेच याची लक्षणेही सतत बदलत असल्याचं दिसून येत आहे.

मागच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्याची लक्षणे ही ताप येणे, जीभेची चव जाणे, वास जाणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे याबरोबरच घशात खव खव होणे अशी होती. आताच्या पसरत असलेल्या कोरोनाची लक्षणे ही कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, अशक्तपणा आणि त्वचेवर रॅशेस येणे असे आहेत.

फेब्रुवारी महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे तसेच काही दिवसांमध्ये दर दिवशी एक लाख रुग्ण संख्याही वाढू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. साधारण 15 एप्रिल नंतर कोरोनाची ही लाट आटोक्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात असून, नागरिकांनी नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार!

“येत्या 15 ते 20 दिवसात देशात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता”

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! पुढील 7 दिवसांसाठी पुण्यातील PMPML बससेवा राहणार बंद

पुण्यात आता लॉकडाऊनवजा निर्बंध; वाचा महत्त्वाची नियमावली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More