बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची परिस्थिती भयंकर, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने ‘वीकेंड लॉकडाऊन’ म्हणजे शनिवार-रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपचा पाठिंबा असून जनतेने देखील पाठिंबा द्यावा, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा तसेच लसीकरणाच्या मोहिमेस मदत करावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध राहतील असा निर्णय सरकारने घेतला आहे. आम्ही जनतेला आव्हान करतो, या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावं. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो, त्यांनी नियमांचे पालन करावं, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आताची कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता आमचे सर्व नेते आणि आम्ही सर्व सहकार्य करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करता येईल या दृष्टीकोनाने भाजपचे कार्यकर्ते यात सहभागी होतील. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती प्रचंड भयावह आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज दिवसभरात राज्यात 57 हजार नवे रुग्ण आढळले आहेत, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, राज्य सरकारने सक्तीची कारवाई करुन 4 ते 5 हजार कोटी रुपये वीज ग्राहकांकडून जमवले आहेत. आता तरी राज्य सरकारने वीज कनेक्शन कापणं बंद केलं पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. त्यामुळे वीज कनेक्शन कट करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी देखील फडणवीस यांनी यावेळी केली.

थोडक्यात बातम्या – 

वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला!

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा ‘तो’ हॉट व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना लावलंय अक्षरशः वेड

सध्याच्या भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला तोड नाय!; सौरभ गांगुलीनं केलं तोंडभरुन कौतुक

राज्यात विकेंड लॉकडाऊन, असं असेल लॉकडाऊनचं स्वरुप

निशब्द भावनांना बच्चू कडूंची साथ, ‘त्या’ चिमुकल्याला मिळाली सायकल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More