बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात कडक लाॅकडाऊन लागू

बिजिंग | गेल्या दोन वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा (Corona) कहर सुरू आहे. जगभरात अनेक ठिकाणी लसीकरण (Vaccination) करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही कोरोना नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यातच आता ज्या चीनमधून (China Lockdown) कोरोनाची सुरूवात झाली तिथे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरू केलं आहे.

मागील काही दिवसांपासून कमी झालेला कोरोना आता पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. झोजियांग प्रांतात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण आढळताना दिसत आहेत. त्यामुळे आता चीनमध्ये पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचा ओमिक्राॅन विषाणू देखील मोठ्या प्रमाणावर आढळून येत आले.

गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ एकच व्यक्ती घराबाहेर पडू शकतो, अशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत. चीनमध्ये कोरोना नियमांचं पालन करण्याची सक्ती केल्याने आता जनता देखील त्रस्त असल्याचं दिसतंय.

दरम्यान, पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागल्यामुळे आता चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना जाणवतोय.  त्यामुळे चीन सरकार निर्बंध कडक करून खबरदारी घेत असताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

IPL Auction चा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार मेगा लिलाव

काँग्रेसचा मंत्री बदलणार???, सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

OBC Reservation: हिवाळी अधिवेशनात ठाकरे सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

“राज्य विकणं म्हणजे चहा विकण्यासारखं वाटलं का?”

लसीकरण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More