बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झाल्यानं तरुणानं वाढदिवसादिवशीच उचललं धक्कादायक पाऊल!

सांगली | कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच कोरोनाची भीती अजूनही अनेकांच्या मनात असलेली पाहायला मिळत आहे. याच भीतीतून एका तरूणानं धक्कादायक पाऊल उचललं असल्याचं समोर येत आहे.

कोरोना संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या भीतीने सांगली जिल्ह्यातील तरुणानं वाढदिवसादिवशीच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. केवळ तीन महिन्यापुर्वी लग्न झालेल्या तरुणाच्या अशा मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव निखील लक्ष्मण भानुसे असून त्याचं वय 28 वर्ष होतं. निखील हा व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर होता. चार दिवसांपूर्वीच त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून तो अस्वस्थ होता. त्याच नैराश्यातून त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

दरम्यान, कुरळप पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. कोरोना झाल्याच्या भितीतून त्याने आत्महत्त्या केल्याचे नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यातच ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

थोडक्यात बातम्या – 

करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचा फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

“मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाबद्दल अ‍ॅलर्जी, भाजप देशाचा चेहरा बिघडवत आहे”

‘…अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही’

आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारनं कृषी विधेयक मागे घ्यावं-राजू शेट्टी

‘ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार’; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More