बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!

मुंबई | पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांनी कोरोनाच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधीतून गरजूंना मदतीचा हात दिला होता. मात्र हे करत असतांना त्यांनाच कोरोनाने विळखा घातला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मागील 2 महिन्यापासून संजय भोपी कोविडवर उपचार घेत होते. त्यातून ते बरे झाले होते. मात्र कोरोनामुळे त्यांची फुफ्फुसे निकामी झाली आणि त्यांना त्रास व्हायला लागला. उपचारदरम्यान त्यांचा रूग्णालयातच मृत्यू झाला.

संजय भोपी यांना उपचारासाठी अपोलो रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्याठिकाणी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांची कोरोनाबरोबर लढाई सुरु होती. मात्र या लढवय्या लोकप्रतिनिधीची अखेर प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक संजय भोपी यांनी नेहमीच राजकारणशिवाय काम केलं आहे. समाजासाठी दिवस रात्र मेहनत करून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी कार्यरत रहाणारे, कुठलीही जबाबदारी स्वतःचे काम समजून ती यशस्वी करण्यासाठी धडपडणारे, संजय दिनकर भोपी सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने राजकारणात आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

थोडक्यात बातम्या

उद्योजक-व्याख्याते शरद तांदळे यांच्या ‘या’ व्हिडीओमुळे वारकरी संतप्त, पाहा व्हिडीओ

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

“सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा”

Tata, Mahindra च्या दोन शानदार SUV लवकरच होणार लाँच; जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More