बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काढ्या आणि योगामुळे देशात कोरोनाची लाट आटोक्यात आली”

नवी दिल्ली | मुंजापारा महेंद्रभाई यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलं असून आयुष मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडं सोपवण्यात आलं आहे. याशिवाय महिला आणि बालकल्याण विभागाचं राज्यमंत्रीपदही त्यांना देण्यात आलं आहे. पदग्रहण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना महेंद्रभाई यांनी कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येण्याचं श्रेय काढा आणि मोदींचा योगा याला दिलं आहे.

काढा प्यायल्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याची प्रतिक्रिया नवे आयुष राज्यमंत्री मुंजापारा महेंद्रभाई यांनी दिली आहे. आता आयुष राज्यमंत्री मुंजापारा महेंद्रभाई यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काढ्यामुळे देशात कोरोनाची लाट आटोक्यात आली असून त्याचं श्रेय होमिओपथीला द्यायला हवं, असं मुंजापारा महेंद्रभाई यांनी म्हटलंय. तसेच योगामुळे कोरोनापासून रुग्णांचा बचाव झाला. विरोधकदेखील आपल्याकडून औषधं घेतात, असंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशात वाद निर्माण झाला होता. स्वतः बाबा रामदेव हे आयुर्वेदिक डॉक्टरही नसताना कुठल्या अधिकारानं ते बोलतात, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशननं उपस्थित केला होता.

थोडक्यात बातम्या- 

“अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे शिवसैनिक नाराज”

एकनाथ खडसेंनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स!

‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणं शक्य’; शक्तिकांत दास यांनी केंद्राला दिला हा सल्ला

“कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”

“चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्यात, किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार” 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More