पुणे महाराष्ट्र

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

पुणे | पुण्यात आज कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे 78 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात सध्या एकूण 445 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर कोरोनाचा संसर्ग झालेले 11 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

49 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 30 रुग्णांवर ससूनमध्ये तर उर्वरित रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1217 झाली असून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यानं सध्या पुण्यात 966 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आज कोरोनाबाधित 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1282 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 6939 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज ५२२ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

चीनबद्दल जगात द्वेष वाढणं ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी- नितीन गडकरी

देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या