बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

11 वर्षांचा श्रावणबाळ! सायकल रिक्षातून आई-वडिलांना घेऊन मूळगावी निघाला

मुंबई | लॉकडाउन सुरु झाल्यापासून कामागारांनी आपल्या राज्यात परत जाण्याचा मार्ग निवडला असून अनेकजण सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने पायी चालतच आपल्या मूळगावी निघाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून एक 11 वर्षांचा मुलगा आपल्या कुटुंबासहीत बिहारला जाण्यासाठी निघाला आहे. हा 11 वर्षांचा मुलगा स्वत: सायकल रिक्षा चालवत आपल्या आई-वडिलांना गावी घेऊन निघाला आहे.

वाराणसीमध्ये वास्तव्यास असलेलं हे कुटुंब आपला सगळा संसार सायकल रिक्षामध्ये टाकून बिहारमधील आरिया जिल्ह्यामधील मूळगावी निघालं आहे. ही सायकल हा मुलगा आणि त्याचे वडील आलटून पालटून चालवत असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, वयस्कर वडील थकल्यानंतर हा 11 वर्षांचा मुलगा उंची पूरत नसतानाही सायकल चालवत चालवत आपल्या घराच्या दिशेने निघाल्याचा दावा सोशल सोशल मीडियावर केला जात आहे. या मुलाचं सोशल मिडियावर कौतुक होत असून अनेकांनी या मुलाला आजचा श्रावणबाळ म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे 1 हजार 576 नवे रूग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

“पॅकेज म्हणजे काय सिरीयल आहे का? पंतप्रधानांनी मोमो दाखवून अर्थमंत्र्यांनी रोज एपिसोड सादर करावा”

महत्वाच्या बातम्या-

समूह संसर्गासाठी भारताने तयार रहावं; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

स्वदेशी उत्पादनांसाठी रामदेव बाबा लाँच करणार ऑनलाइन पोर्टल ‘ऑर्डर मी’

दिलासादायक… पुण्यात आज मिळालेल्या रूग्णसंख्येपेक्षा डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या जास्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More