बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उद्यापासून 15 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

मुंबई | राज्य सरकार ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करत असताना कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने भिवंडीत 15 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

18 जून ते 3 जुलैपर्यंत भिवंडी शहर पूर्पणणे बंद असणार आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रशासनाने कठोर लॉकडाउन जाहीर केला आहे.

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने महापौर प्रतिभा पाटील यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला पाहिजे असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनीच पाठिंबा दिला. आयुक्तांनीही यासाठी परवानगी दिली आहे.

दरम्यान, शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी सर्वांना काळजी घेण्याचं गरजेचं असल्याने फक्त मेडिकल आणि दूध, किराणा दुकानं ठराविक वेळेसाठी सुरु राहतील असं सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

भाजप नेते हरिभाऊ जावळेंच्या निधनाबद्दल एकनाथ खडसेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

महत्वाच्या बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

“झोपाळ्यावर बसून झालं, आता चीनला लाल आँखे दाखवा”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More