बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे

मुंबई | औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी एकत्र आलेल्या नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून तीन कर्मचाऱ्यांना जखमी केलं. या घटनेवरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे. पोलिसांनी किती सहन करत राहावं??? काय मर्यादा आहे की नाही. गुन्हे झाले की दोन-तीन कलमं लावून विषय विसरायचा आणि राज्य सरकार आम्ही कार्यवाही केली सांगून मोकळे होतं, असं  निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील संभाजीनगर मार्गावर असणाऱ्या अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोक धार्मिक स्थळी जमले होते. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील काही पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले आणि तेथील लोकांना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलीस अधिकारी आणि दोन हवालदार जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी 27 जणांना अटक केल्याचं कळतंय.

 

ट्रेंडिंग बातम्या-

अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी

ठाकरे सरकारने आतातरी भानावर यावं- विखे पाटील

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”

धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More