देश

‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली

नवी दिल्ली | कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं असून पीएम केअर्स फंडची सुरुवात केली आहे. या निधीसाठी देशातील वेगवेगळ्या भागातील आमदार आणि खासदारांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील भाजपचे आमदार श्याम प्रकाश यांनी कोरोनासंदर्भात केलेली मदत परत मागितली आहे. प्रकाश यांनी आपल्या आमदार निधीमधून 25 लाखांचा निधी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिला होता. मात्र आता प्रकाश यांनी हा निधी परत करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे.

हरदोई जिल्हा प्रशासनाने कोरोनासंदर्भातील खरेदी करताना भ्रष्टाचार केल्याने मला माझे पैसे परत हवे आहेत, असं प्रकाश यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हरदोईमधील मुख्य विकास अधिकाऱ्यांनी मी केलेल्या आर्थिक मदतीचा कुठे आणि कसा वापर केला जाईल यासंदर्भात कोणतीच माहिती मला दिलेली नाही, असंही प्रकाश यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गा विरोधातील- मोहन आगाशे

“कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी किम जोंग उन लांब राहतायत”

अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली; आयसीयूमध्ये उपचार सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या