बुलढाणा | कोरोनामुळे अनेक आर्थिक व्यवहार आणि उद्योग धंदे बंद असल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशाच कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेने आर्थिक मदत करावी असं आवाहन सरकारी यंत्रणांच्या मार्फत केलं जात आहे. या आवहानाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी पुढे येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले आहेत. तसेच सामाजिक भान जपत शवविच्छेदनाचं काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपला एका महिन्याचा पगार महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. यासंदर्भात बुलढाणा जिल्हा माहिती केंद्राने माहिती दिली आहे.
बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात सफाईगार पदावर शवविच्छेदनाचं काम करणारे मोहम्मद अफसर शेख गफ्फार यांनी कोरोना आजारावरील नियंत्रणाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचं 23 हजार रूपये वेतन आज बँक खात्यात जमा केलं आहे, असं ट्विट बुलढाण्यातील माहिती केंद्राने केलं आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये अशाच प्रकारे तेलंगणामधील एका सफाई कर्मचाऱ्याने त्याचा दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला होता.
Money never makes one rich, it’s always the heart to give that makes one rich ! https://t.co/dvOJorBysr
— Suman Rawat Chandra, IAS (@oiseaulibre3) May 6, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
‘अरे रडताय काय मी, आहे ना तुमच्यासाठी…’ दुखावलेल्या कार्यकर्त्यांची पंकजांनी घातली समजूत
फोटो फिचर | अरुण गवळीच्या लेकीच्या लग्नाचे फोटो पाहिले का?
महत्वाच्या बातम्या-
नागरिकांनो घाबरू नका; भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार- केंद्रिय आरोग्यमंत्री
रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी- संजय राऊत
आज फिर हमने दिल को समझाया; दुखा:त बुडालेल्या मेधा कुलकर्णींचं ट्विट
Comments are closed.