बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नच्या फॉर्ममध्येही होणार बदल

मुंबई | इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भरण्याच्या मुदतीत वाढ केल्यानंतर आता सरकारने त्याच्या फॉर्ममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या नवीन फॉर्मची माहिती या महिन्याच्या अखेरीस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने दिली आहे.

कोरोना व्हायरसच्या या संकटामुळे सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. इन्कम टॅक्स संदर्भातील अनेक कामांसाठी 31 मार्च ही डेडलाइन असते. पण ती यावेळी वाढवून 30 जून करण्यात आली आहे.

कोरोनामुळे करदात्यांना रिटर्न भरताना अडचणी येतील हे लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुदतवाढीची घोषणा केली होती.

एप्रिल ते जून 2020 या काळात केलेल्या गुंतवणुकीचा किंवा व्यवहाराचा फायदा करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना घेता यावा यासाठी फॉर्ममध्ये बदल करण्यात येत आहेत. ते बदल केल्यानंतर 31 मेपासून रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

ट्रेंडिंग बातम्या-

लातूर जिल्हा कोरोनामुक्त, आठही प्रवासी रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

…म्हणून अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पुणे पोलिसांचे आभार

महत्वाच्या बातम्या-

गरजुसांठी पंचवीस गावांत पेटल्या चुली; बीडमध्ये रोज 5,000 भाकरींचा पुरवठा

मोदी सरकार पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करणार की नाही?; अर्थखात्यानं दिलं स्पष्टीकरण

आपले कार्य निश्चितच चांगले आहे मात्र…; विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More