महाराष्ट्र मुंबई

मुंबई-पुण्यात लॉकडाउनचा कालावधी 18 मे पर्यंत वाढू शकतो- राजेश टोपे

Loading...

मुबई | देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या तीन मे रोजी संपणार आहे. पण मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो, असं आरोग्य मंत्री राजेश यांनी सांगितलं आहे.

मुंबई, पुण्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरात 18 मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणं हा लॉकडाउन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. पण त्यांचा फैलाव कमी होत नसेल तर आम्हाला लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल, असं टोपेंनी सांगितलंय.

दरम्यान, भारतात सध्या कोरोनाचे 20,080 रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक 6,817 कोरोना रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर, पुण्यात कोरोनाचे 980 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या