मुंबई | चीनमधील वुहान आणि हुबई या शहरांमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत जगाला वेड लावलं आहे. कोरोनाने शक्तीशाली राष्ट्र असलेल्या राष्ट्रांचीही दैना केली आहे. मात्र सध्या वुहानमध्ये नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्या बााधितांची संख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे वुहानमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अशातच भारतातील केरळ राज्यामधील अनीला पी अजयन या मुलीने परत न येता तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्या माध्यमातून हा विषाणू भारतात येऊ नये असं मला वाटतं म्हणून मी भारतात परत न येण्याचा निर्णय घेतला आहे, असं चायनीज अकॅडमी ऑफ सायन्समधील हायड्रोबायलोजी इन्सटीट्यूटमध्ये (आयबीएच) डॉक्टरेटचं शिक्षण घेणाऱ्या अनीला हिने एका माध्यमाशी बोलताना सांगितलं.
मागील तीन महिन्यापासून मला वुहानमध्ये केवळ रुग्णवाहिकांच्या सायरन आणि चीनी भाषेतील रेडीओ मेसेजेसचाच आवाज ऐकू येत होता. मी येथे भेटलेले अनेक लोकं मला निराश दिसत होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्वजण आनंदी आहेत. सर्वजण जरा शांत झाले आहेत, असं अनीलाने म्हटलं आहे.
दरम्यान, येथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सध्या आनंद दिसत आहे. मात्र प्रत्येकजण सतर्क आहेत. स्त्यांवर पुन्हा लोकं दिसू लागली आहेत. आमच्या इन्स्टीट्यूटमध्ये विद्यार्थीही परत येऊ लागले असल्याचं अनीलाने म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- चित्रा वाघ
वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!
महत्वाच्या बातम्या-
गायिका कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटीव्ह; डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन
राजभवनात जाऊन काड्या करणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही- संजय राऊत
आयपीएलमधील या संघाने कोरोना बाधितांसाठी दिले तब्बल 10 कोटी
Comments are closed.