देश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी रुग्णालयात गेले असता कोरोना चाचणी केली. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं.

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात राहण्याचं तसंच कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी, अशी विनंती प्रणव मुखर्जी यांनी केली आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत 22 लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 62 हजार 64 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पुन्हा ईडी कार्यालयात दाखल

संजय राऊत…कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे- नारायण राण

“मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, हे संजय राऊतांचं म्हणणं हास्यास्पदच”

देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले ‘हे’ तीन सल्ले, म्हणाले…

भगवान परशुरामांची सर्वात मोठी मूर्ती बसवणार; मायावतींचं ब्राम्हण समाजाला आश्वासन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या