नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 3 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवलं. केंद्राने दिलेल्या सूचनांचं पालन प्रत्येक राज्य कोटेकोरपणे करत आहे. अशातच रविवारी गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
गोव्यासाठी समाधानाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. गोव्यातील शेवटच्या करोना रुग्णाची चाचणीही निगेटीव्ह आली आहे. सर्व डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी त्यांनी केलेल्या कामासाठी कौतुकास पात्र आहेत. 3 एप्रिलपासून गोव्यामध्ये एकही नवा रुग्ण अढळून आलेला नाही, असं प्रमोद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गोव्याचे आऱोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही याबाबत माहिती दिली आहे.
सध्या राज्यात करोनाचा एकही रुग्ण नाहीय. त्यामुळे लॉकडाउनचे नियम पाळणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे तसेच केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे आपली जबाबदारी आहे, असं राणे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अधिकृत आकडेवारीनुसार गोव्यामध्ये 758 जणांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी सात जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. या सातही जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यामध्ये 3 एप्रिल रोजी करोनाचा शेवटचा रुग्ण अढळून आला होता.
A moment of satisfaction and relief for Goa as the last active Covid-19 case tests negative. Team of Doctors and entire support staff deserves applause for their relentless effort. No new positive case in Goa after 3rd April 2020.#GoaFightsCOVID19 @narendramodi
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 19, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबईत बसून कोणी जागतिक आरोग्य संघटनेची ‘तबलिगी’ करू नये; राऊतांचा फडणवीसांना टोला
पीएम केअर फंडाच्या नावाखाली भाजप नेत्यांनी दिलेली वेबसाईट फेक?
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील सरपंचाच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप; फोन करून केली आपुलकीने चौकशी
जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न; नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार
सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नच्या फॉर्ममध्येही होणार बदल
Comments are closed.