बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

सांगली | राज्यात कोरोना विषाणूने (Corona Virus) अक्षरश: हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे चिन्हं दिसू लागली आहेत. त्यातचं राज्यात ओमिक्रॉनचे रुग्णही (Omicron) वाढू लागले आहेत. मात्र, आता सांगलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ओमिक्रॉनबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 92 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली होती. या विद्यार्थिनींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 14 दिवस उपचार घेतल्यानंतर या विद्यार्थिनी पुर्णपणे कोरोना मुक्त झाल्या होत्या. मात्र, पुन्हा यातील 56 जणींना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची ओमिक्रॉन टेस्ट करून ते नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. तेव्हा या 92 विद्यार्थिनींपैकी 56 विद्यार्थींनींना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मिरज शहरात एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, मिरजच्या शासकीय विद्यालयात सुरुवातीला एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिच्या रुममेट असणाऱ्या 9 जणींनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी 92 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार एसटी महामंडळाकडे आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत”

सोनं-चांदी दरात ‘इतक्या’ रुपयांनी घसरण; वाचा आजचे ताजे दर

‘महाजनांना बुधवार पेठेत दाखवायची गरज’ खडसेंच्या टीकेवर महाजनांचं प्रत्युत्तर

‘…तर तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील’; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

पोस्टाची ‘ही’ योजना कमी गुतंवणूकीत मिळवून देईल मोठा फायदा, वाचा काय आहे योजना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More