पुणे महाराष्ट्र

पोलीस दिसताच पत्नीला सोडून पुण्यातील पतीनं काढला पळ!

Loading...

पुणे | जमावबंदी आदेशाला लोक जुमानत नसल्याचं दिसताच सरकारने संचारबंदी लागू केली. तरीही लोक रस्त्यावर फिरत होते. सरकारनं पुढचं पाऊल उचलत पोलिसांना हे सगळं थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर उगाच फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अद्दल घडवली जात आहे.

पोलिसांविषयी लोकांच्या मनात धाक निर्माण होत असून, याचीच प्रचिती पुण्यातील अलका चौकात आज दिसून आली. पत्नीसोबत घराबाहेर पडलेल्या पतीनं अलका चौकात आल्यानंतर समोर पोलीस दिसताच चक्क पत्नीला तिथेच सोडून पळ काढला.

Loading...

राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातील करोना बाधितांचा आकडा शंभरी पलिकडे गेला आहे. त्यामुळे सरकारनं जमावबंदी लागू केली. मात्र परिस्थितीचं भान न ठेवता नागरिक रस्त्यावर फिरत आहे.

दरम्यान, परिणाम दिसत नसल्यानं पोलिसांनी शिस्तीचा दंडुका हाती घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात आता धाक निर्माण होऊ लागला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“लोकांनो घाबरू नका, गडबड गोंधळ करू नका; भाजीपाला, किराणा दुकाने तसंच मेडिकल सुरू राहणार”

लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे; जयंत पाटलांची मोदींवर सडकून टीका

महत्वाच्या बातम्या-

होळीला अ‌ॅडमिट, गुढीपाडव्याला डिस्चार्ज; पुण्यातील दाम्पत्याची ‘कोरोना’वर मात

…तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश!

बाहेरच्या लोकांनी गावात प्रवेश करु नये म्हणून गावकऱ्यांची नामी शक्कल

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या