Top News आरोग्य उस्मानाबाद कोरोना महाराष्ट्र

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण!

Photo Courtesy- Pixabay

उस्मानाबाद | राज्यात कोरोना रूगणांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत होते. यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून करोनासदृष्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

या आधी लस टोचल्यानंतरही पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतरही या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो- खासदार संभाजीराजे

बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

महाराष्ट्रसह देशातील ‘या’ राज्यातही कोरोनारूग्णांचा वाढला आकडा

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी

गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढले, जाणून घ्या ताजी आकडेवारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या