Top News महाराष्ट्र मुंबई

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची लागण

मुंबई  |  कोरोना रोगाचा मंदावलेला फैलाव लक्षात घेता विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरवण्या आलं आहे. यावर कोरोनाचे सावट आलं असून 17 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील पोलिस, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. एकूण 2500 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये 17 जणांचा कोरानाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून यामध्ये पोलीस कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.

सुदैवाने अधिकारी, विधानभवन कर्मचारी यांचा समावेश नाही. तसंच कोरोना चाचणी केलेल्या लोकप्रतिनिधींना कोरोनाची लक्षण नसल्याचे समोर आले असल्याने हिवाळी अधिवेशन होणार आहे.

दरम्यान, मागील पावसाळी अधिवेशनात 52 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच दोन दिवसांच्या या अधिवेशनात  6 अध्यादेश आणि 10 विधेयकं मांडण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“भाजप नेत्यांचं हे वर्ष सरकार कधी पडतंय याचा मुहूर्त शोधण्यातच गेलं”

‘दिल्लीतील चालू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीत तर मग…’; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

“विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांतदादांचा चेहरा पडलेला”

“गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?”

“रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या