महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वे मिळत असल्याचं सांगितल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत असून हे चुकीचं आहे. रेल्वे मंत्री आणि मंत्रालयाने महाराष्ट्राला वारंवार मदत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रेल्वे मंत्री लक्ष घालत असून ट्रेन पुरवत आहेत. अनेकदा रात्री उशिरा यादी पाठवल्यानंतरही ट्रेन दिल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री तसंच इतर शिवसेना नेत्यांनी केलेलं वक्तव्य पूर्ण राजकारण आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप वाईट आहे. देशातील 30 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. सरकार पूर्पणपणे अपयशी ठरलं आहे. हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका केली जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल- आनंद महिंद्रा

…म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता- तृप्ती देसाई

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो सावधान… पुण्यात आज सापडले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

अजितदादा कुठं आहेत?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या