बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबमधील कर्फ्यू हटवण्यासंदर्भात मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा

चंदिगढ | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला कर्फ्यू हटवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. मात्र यावेळी लॉकडाउन कायम ठेवण्यात येणार आहे. पंजाब सरकारने राज्यात लॉकडाउन 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी 18 मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होताना लोकांना दिलासा देणाऱ्या काही घोषणा केल्या जातील असं सांगितलं आहे. लोकांना सहकार्य केल्याशिवाय सरकारची योजना यशस्वी होऊ शकत नाही, असंही अमरिंदर सिंग यांनी सांगितलं आहे.

पंजाबमधील सर्व शहरांना दिलासा देण्यात येणार आहे जेणेकरुन व्यवसाय-उद्योग सुरु व्हावेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत ते परिसर आणि रस्ते सील करण्यात येणार आहेत. ही राज्य सरकारची नवी योजना असून 18 मे पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घोषणा केल्या. सध्या पंजाबमध्ये कोरोनाचे 657 रुग्ण आहेत. तीन रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख

महत्वाच्या बातम्या-

दोन युवा नेत्यांमध्ये पेटलं ट्विटरवाॅर; निलेश राणेंकडून रोहित पवारांचा शेलक्या शब्दात उल्लेख

“महाराष्ट्राचं आर्थिक महत्त्व कमी करणारे मोदी कुठं आणि महाराष्ट्राचं महत्त्व जाणणारे राहुल गांधी कुठं”

पंढरपूर पालखी सोहळ्याबाबत आमदार रोहित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More