बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत एकाच दिवशी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू!

मुंबई | लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून कर्तव्य पार पडत आहेत. पण कोरोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एकाच दिवशी मुंबईत चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत 26 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात मागील दोन दिवसात 129 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या 3 हजार 388 इतकी झाली आहे.

राज्यात आत्तापर्यंत 40 पोलिसांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 388 पैकी आत्तापर्यंत 1945 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण

“तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार”

महत्वाच्या बातम्या-

संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ

सरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय

‘मोदीजी, गाडीला चार चाकं असतात अन्…’; कपिल सिब्बल यांचा मोदींना टोला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More