Top News

‘भारतीय मनाने कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल’; चीनमधील तज्ञांकडून कौतुक

वुहान | भारतीय मनाने कणखर असून ते कोरोनाचा प्रतिकार शारिरीकरित्या करत नसून मानसिकरित्या करत असल्याचं चीनच्या संसर्गजन्य रोग तज्ञ झांग वेनहाँग यांनी म्हटलं आहे.

भारतात अडकलेल्या चीनमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मी भारतातील एका धार्मिक कार्यक्रमातील गर्दी पाहिली. तिथे कोणीही मास्क घातलेलं नव्हतं. असं नाहीये की, भारतीय शारिरीकरित्या करोनाचा प्रतिकार करतात. पण ते मानसिकरित्या कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल, असं झांग वेनहाँग यांनी म्हटलं आहे.

भारतीयांचं मन शांत असल्याचं यावेळी झांग यांनी सांगितलं. झांग वेनहाँग हे चीनमधील शांघाई येथे असणाऱ्या हुआशान रुग्णालयाच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख आहेत. यावेळी त्यांनी भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ही संख्या फार कमी असल्याचं सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या