बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारकपात होणार का?; मोदी सरकारने केला मोठा खुलासा

नवी दिल्ली | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही पगारकपात करण्यात येणार नसल्याचं सांगत अर्थ मंत्रालयाने चुकीचं वृत्त पसरत असल्याची माहिती दिली आहे. कोणत्याही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाणार नसल्याचं अर्थ मंत्रालयाने सांगितलं आहे.

ट्विट करत अर्थ मंत्रालयाने हे वृत्त निराधार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही. काही प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त चुकीचं असून पूर्णपणे निराधार आहे, असं ट्विट अर्थ मंत्रालयाने केलंय.

एप्रिल महिन्यातही मंत्रालयाने अशाच पद्धतीचं एक ट्विट करत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली जाणार असल्याचं वृत्त चुकीचं आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर याआधी सरकारकडून केंद्र सरकार पेन्शन योजनेचे लाभार्थी असणाऱ्या वरिष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच विधवा महिलांसाठी तीन महिन्यांची पेन्शन एकत्र देत असल्याचं जाहीर केल होतं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

सॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक

राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

महत्वाच्या बातम्या-

केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मागणी

‘दारुची दुकानं सुरु केली मग मंदिरही खुली करा’; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More