देश

लॉकडाउन कुठे कडक आणि कुठे शिथिल करणार?; नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट

नवी दिल्ली | लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपत आला असला तरी परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने लॉकडाउनसंबधी केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत यावर भाष्य केलं आहे.

लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचं ते राज्यांनी विचार करून ठरवावं असं नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणं ठरवा. मास्क, फेसकव्हर आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. तसंच लॉकडाउनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आपण योग्य वेळी लॉकडाउनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय. पण भारतावरचे संकट टळलेलं नाही, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

किशोरीताई, तुम्ही खरा आदर्श निर्माण केला आहे- धनंजय मुंडे

पत्ते खेळणं पडलं महागात; 40 जणांना झाली कोरोनाची बाधा!

राजा कायम पण ताण वाढेल; पाहा आणखी काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या